'
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र सरकारने सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना काही अटींसह आर्थिक लाभ देण्यात येतो.
डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळेल?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आचारसंहितेच्या कारणास्तव नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबरमध्येच दिला गेला. त्यांनी असेही नमूद केले की, नोव्हेंबरचे पैसे डिसेंबर मध्ये येणार आहेत.
🙏देवरी मध्ये दिव्य ज्योती शिव आराधना भजन किर्तनाचे आयोजन पाहा माहिती👇👇👇
महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात वचन दिले होते की, सत्तेत परतल्यास या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये केली जाईल. निवडणुकांनंतर महायुतीला बहुमत मिळाल्याने, या वचनाची अंमलबजावणी होण्याची शक्यता
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या योजनेतील मासिक रक्कम २,१०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
अजित पवार यांचे स्पष्टीकरण :-
काळजीवाहू सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संभ्रमावर भाष्य करताना स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सामाजिक कार्यकर्त्यांसमोर सरकारची बाजू
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या पुण्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी त्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन सरकारची भूमिका मांडली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना दिलासा देत सांगितले की, काळजीवाहू सरकारच्या कार्यकाळात निकष बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
डिसेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरमध्येच जमा होण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन सरकारच्या निर्णयानुसार, रकमेतील वाढ लवकरच लागू होईल. अद्ययावत माहितीसाठी अधिकृत सरकारी घोषणांची वाट पाहणे उचित ठरेल.
महायुती सरकारने निवडणूक काळात वचन दिले होते की महिलांना 1,500 रुपयांऐवजी 2,100 रुपये दिले जातील. पण निवडणूक झाल्यानंतर योजना बंद होईल किंवा निकष बदलले जातील, अशी चर्चाही सुरू होती. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही वितरीत न झाल्याने महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
डिसेंबर महिन्यातील हप्त्यासाठी प्रतीक्षारत महिलांना लवकरच दिलासा मिळेल, अशी आशा आहे.ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल, यात शंका नाही.
,⚔️⚔️जय महाराष्ट्र ⚔️⚔️



0 Comments